रेल्वे उशिरा सुटल्यास अधिकार्‍यांवर कारवाई

0
50

सुरेश प्रभू यांचे संकेत
नवी दिल्ली, १८ एप्रिल 
विमान प्रवासात गोंधळ घालणार्‍या प्रवाशांमुळे विमान उशिरा सुटल्यास पाच ते १५ लाख रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याचा नवा नियम तयार होत असतानाच, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनीही आता रेल्वेबाबत नवा नियम तयार करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. रेल्वे गाडीला उशिर झाल्यास थेट संबंधित अधिकार्‍यांवरच कारवाई केली जाईल, असे संकेत प्रभू यांनी दिले आहेत.
अलीकडील काळात रेल्वे गाड्यांना उशिर होण्याचे प्रकार फार जास्त वाढत आहेत. अनेक प्रवाशांनी याबाबतच्या तक्रारी सुरेश प्रभू यांच्याकडे केल्या आहेत. याच अनुषंगाने हा नवा नियम तयार करण्यात येणार आहे. रेल्वे गाड्या अगदी वेळेतच सुटायला हव्या, असा इशाराच सुरेश प्रभू यांनी रेल्वे अधिकार्‍यांना दिला आहे. दरम्यान, प्रभूंच्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी रेल्वेच्या विभागीय प्रमुखांनी रात्री १० ते सकाळी ७ या वेळेत वरिष्ठ अधिकार्‍यांची नेमणूक करून, त्यांच्या कामांच्या वेळाही निश्‍चित केल्या आहेत. रात्री एखाद्या गाडीला उशिर होत असल्यास परिस्थितीवर नजर ठेवून अधिकार्‍यांनी ती गाडी वेळेत अशी सुटेल, याची काळजी घ्यायलाच हवी, असे विभागीय प्रमुखांनी स्पष्ट केले.  (वृत्तसंस्था)