कॉंगे्रसचे लवली यांचा भाजपात प्रवेश

0
99

नवी दिल्ली, १८ एप्रिल 
कॉंग्रेस नेते आणि दिल्ली प्रदेश कॉंगे्रसचे माजी अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांनी आज मंगळवारी भाजपात प्रवेश केला. विद्यमान नेतृत्वात कॉंगे्रस पक्ष मृतप्राय झाला आहे, अशी टीका त्यांनी केली.
लवली यांच्यासोबत दिल्ली युवक कॉंगे्रसचे अध्यक्ष अमित मलिक यांनीही भाजपात प्रवेश केला. या दोघांनीही अलीकडेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली होती. त्याचवेळी त्यांचा भाजपात येण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
लवली हे शीला दीक्षित मंत्रिमंडळात महत्त्वाच्या पदावर होते. दिल्ली महानगर पालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असतानाच लवली आणि मलिक यांच्या प्रवेशामुळे भाजपा अधिकच बळकट झाली आहे.  (वृत्तसंस्था)