चाकू हल्ल्यानंतर नवी ऊर्मी पेत्रा पुनरागमनाच्या तयारीत

0
94

पॅरिस, १८ एप्रिल 
चाकू हल्ल्याच्या घटनेनंतर तब्बल सहा महिने टेनिसपासून दूर राहिलेली पेत्रा केवितोव्हा फ्रेन्च ओपन टेनिस स्पर्धेतून पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.
दोन वेळा विम्बल्डन ओपन विजेती राहिलेल्या पेत्रा केवितोव्हाच्या झेक प्रजासत्ताक येथील घरात गत डिसेंबर महिन्यात एक चोर घुसला होता. तेव्हा पेत्रा खडबडून जागी झाली. चोरीचा डाव फसल्यामुळे चोराने तिच्यावर चाकूने हल्ला चढविला. त्याचा प्रतिकार करताना पेत्राच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. डॉक्टरांनी तिला विश्रांतीचा सल्ला दिला होता. आता ती तंदुरुस्त झाली असून फ्रेन्च ओपनच्या माध्यमातून ती टेनिस कोर्टवर पुनरागमन करणार आहे.
रोलॅण्ड गॅरोससाठी उद्या माझे प्रवेश यादीत नाव राहील, असे खुद्द पेत्राने इन्स्टाग्राम अकाऊन्टवर पोस्ट टाकून जाहीर केले. (वृत्तसंस्था)