आयपीएल : रोख पुरस्कार व ट्रॉफी कोण जिंकणार?

0
142

लाखोंच्या पुरस्कारांची उधळण
नवी दिल्ली, १८ एप्रिल 
समस्त जगात इंडियन प्रीमियर लीग ही सर्वात श्रीमंत अशी टी-२० क्रिकेट स्पर्धा आहे, परंतु या आयपीएल-१०च्या सांगता समारंभात कोट्यवधी रुपयांच्या रोख पुरस्कारांची उधळण क्रिकेटपटूंवर होणार आहे.
वास्तविक आयपीएल-२०१७च्या खेळाडूंच्या लिलावात आधीच कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले असून, या सामन्यादरम्यान प्रत्येक सामन्यावर भरमसाठ खर्च करण्यात येत आहे.
सरतेशेवटी अंतिम सामन्यानंतर आयपीएल विजेता व उपविजेता तसेच इतरही वैयक्तिक पुरस्कारस्वरूपात लाखो रुपयांची उधळण खेळाडूंवर होणार आहे.
पारितोषिक, रोख पुरस्कार व अवार्ड आदींची यादी अशी आहे.
आयपीएल-२०१७ च्या विजेत्या संघाला ः व्हिवो आयपीएल ट्रॉफी
विजेत्या संघाला ः १५ कोटींचा धनादेश.
उपविजेत्या संघाला ः १० कोटींचा धनादेश.
ऑरेंज कॅप ः १० लाख रु. रोख व ट्रॉफी.
पर्पल कॅप ः १० लाख रुपये रोख व ट्रॉफी.
सर्वात व्हॅल्यूएबल खेळाडू ः १० लाख रुपये रोख व ट्रॉफी.
प्रत्येक साखळी सामन्यातील मानकरी : १ लाख रुपये व ट्रॉफी.
शिस्तबद्ध संघ पुरस्कार : ट्रॉफी.
बादफेरीतील प्रत्येक सामन्याचा मानकरी : ५ लाख रुपये रोख व ट्रॉफी
अचूक झेल टिपणारा खेळाडू : १ लाख रुपये रोख व ट्रॉफी.
सर्वाधिक षटकार हाणणारा खेळाडू : प्रती सामना १ लाख रुपये व ट्रॉफी.
सामन्यातील सर्वात शैलीदार खेळाडू : १ लाख रुपये व ट्रॉफी.
मोसमातील सर्वात अचूक झेल टिपणारा खेळाडू : १० लाख रुपये रोख व ट्रॉफी व मोबाईल फोन.
येस बँकेतर्फे सर्वाधिक षटकार हाणणारा खेळाडूचा पुरस्कार : १० लाख रुपये व ट्रॉफी.
जलद गतीने अर्धशतक फटकावणारा खेळाडूचा पुरस्कार : १० लाख रुपये रोख व ट्रॉफी
मोसमातील अप्रतिम फटका हाणणारा खेळाडूचा पुरस्कार : १० लाख रोख, ट्रॉफी व एक कार.
मोसमातील सर्वात शैलीदार खेळाडूचा पुरस्कार : १० लाख रु. रोख व ट्रॉफी.
उदयोन्मुख उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार : १० लाख रुपये रोख. घ(वृत्तसंस्था)