केवळ एका रसगुल्ल्यामुळे लग्न मोडले!

0
103

लखनौ, १९ एप्रिल 
केवळ एका रसगुल्ल्यामुळे भर मंडपात लग्न मोडण्यात आले. लखनौपासून ७० किमी अंतरावरील उन्नाव जिल्ह्यातील कुरमापूर गावात ही घटना घडली आहे.
नवरा मुलगा वरात घेऊन विवाहमंडपात पोहोचला असता सर्व विधी पार पाडत वर्‍हाड्यांचे स्वागत पार पडले. विवाहमुहूर्त उशिराचा असल्याने नवरदेवाच्या वडिलांनी कार्यक्रम संपताच जेवणाचा कार्यक्रम सुरू करण्याची विनंती केली होती.
दुसरीकडे नवर्‍या मुलीच्या नातेवाईकांनी जेवणात एकच रसगुल्ला वाढण्याची सूचना केली होती. मात्र, जेवताना मुलाच्या चुलत भावाने दोन रसगुल्ले घेतले आणि मुलीच्या नातेवाईकांनी मंडपात भांडण्यास सुरुवात केली. त्याठिकाणी चक्क मारामारी सुरू झाली. या गोंधळात आपल्या वडिलांवरही हात उचलल्याचे पाहून नवरीचा संताप अनावर झाला आणि तिने आपले लग्न त्याचक्षणी मोडून टाकले. याबाबत ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. घ (वृत्तसंस्था)