यापुढील निवडणुकांमध्ये पीटीएमचा वापर

0
81

पेपर ट्रेल मशिन्स खरेदीला केंद्राची मंजुरी
नवी दिल्ली, १९ एप्रिल 
भविष्यातील निवडणुकांकरिता पेपर ट्रेल मशिन्स अर्थात पीटीएम खरेदी करण्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज बुधवारी परवानगी दिली.
अलीकडेच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर देशात सध्या अस्तित्वात असलेल्या ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (ईव्हीएम)बाबत विरोधकांनी शंका उपस्थित केली होती. सोबतच, भविष्यातील निवडणुकांसाठी पीटीएमचा वापर केला जावा, अशी मागणीही केली होती.
विरोधकांची मागणी आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्ण करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
देशभरातील मतदान केंद्रांकरिता सुमारे १६ लाख पेपर ट्रेल मशिन्स खरेदी करण्याकरिता निवडणूक आयोगाने केंद्र सरकारकडे ३,१७४ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला होता.
जून २०१४ पासून निवडणूक आयोगाने आतापर्यंत केंद्र सरकारला ११ वेळा आपल्या प्रस्तावाबाबत आठवण करून दिली आहे.
गेल्या वर्षी मुख्य निवडणूक आयुक्त एस. एन. ए. झैदी यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून, हा प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याची विनंती केली होती.  (वृत्तसंस्था)