नीतेश राणेंचाही पगार देण्यास नकार

0
128

कॉंगे्रसवर अशी वेळ आलीच कशी?
मुंबई, १९ एप्रिल
तिजोरीत खणखणाट असल्याचे कारण पुढे करून आपल्या आमदारांना एक महिन्याचा पगार मागणार्‍या कॉंगे्रसला नीलेश राणे यांच्यापाठोपाठ नीतेश राणे यांनीही पगार देण्यास स्पष्ट नकार दिला.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पक्षाचा कारभार चालविण्यासाठी सर्व आमदारांनी एक महिन्याचा पगार पक्षाच्या तिजोरीत जमा करावा, असा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला आधी नीलेश राणे आणि आता नीतेश राणे यांनी विरोध दर्शवला. देशावर ६० वर्षे राज्य करणार्‍या कॉंग्रेसची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झालीच कशी, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
पक्षासाठी योगदान द्यायला जमत नाही म्हणून आपण आमदारांकडे एक महिन्याचा पगार का मागता, असा सवालही नीतेश राणेंनी अशोक चव्हाणांना विचारला. मी आपला पगार कदापि देणार नाही. पक्षाचा कारभार कसा चालवायचा, हे तुमचे तुम्हीच बघा, असे त्यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)