शीला दीक्षित कॉंगे्रसवर ओझे

0
91

लवली यांची टीका
नवी दिल्ली, १९ एप्रिल 
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित या कॉंगे्रस पक्षावर बोझ आहेत, अशी टीका नुकतेच भाजपात सहभागी झालेले कॉंगे्रसचे माजी प्रदेशाध्यक्ष अरविंदरसिंग लवली यांनी आज बुधवारी केली.
लवली यांच्यासह आणि कॉंगे्रस दिल्ली युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित मलिक आणि कॉंग्रेसचे माजी आमदार अमरिश गौतम यांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केला होता. यावेळी शीला दीक्षित यांनी लवली यांना गद्दार संबोधले होते.
हा धागा पकडताना लवली म्हणाले की, कॉंगे्रसवर बोजा असलेल्या दीक्षितांसारख्या नेत्यांपेक्षा देशवासीयांच्या हितासाठी लढा देणार्‍या भाजपात प्रवेश केल्याबद्दल जर मी गद्दार ठरत असेल, तर त्यावरही मला अभिमान आहे. यावेळी त्यांनी कॉंगे्रसचे प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांनाही धारेवर धरले. दिल्ली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी हे झोपडपट्ट्यांमध्ये रात्र घालवतात आणि माकन लोधी गार्डनमध्ये फिरतात. याला जर ते कठोर परिश्रम म्हणत असतील, तर त्यांनी आधी आपले विचार बदलवावे, असा टोलाही लवली यांनी हाणला. (वृत्तसंस्था)