९० अंशाचे तीन हजार फूट उंच डोंगर

0
150

आठ दिवसांत चढून केला विश्‍वविक्रम !
कॅलिफोर्निया, १९ एप्रिल 
चेक गणराज्यच्या ऍडम ऑन्ड्राने जगातील सर्वांत कठीण आणि उभी चढाई आठ दिवसांत पूर्ण करून विश्‍वविक्रम केला आहे. ऍडमने योशेमिते नॅशनल पार्कच्या ३००० फूट उंच डोंगरावर १० तारखेला चढणे सुरू केले. तो ९० अंशांच्या उंच डोंगरावर आठ दिवसांनी पोहोचला. ऍडमच्या आधी अमेरिकन गिर्यारोहक टॉमी क्लाडवेल आणि केविन जोर्गेेनसन यांनी मागच्या वर्षी जानेवारीत येथे उभी चढण चढली होती. त्या दोघांना आपले लक्ष्य गाठण्यास १९ दिवस लागले होते. ऍडम म्हणाला, हा चमत्कार घडल्यासारखे वाटत आहे. हे काम मी विचार करत होतो, तेवढेच कठीण होते. ही माझी आतापर्यंतची सर्वांत उत्तम ‘फ्री क्लायबिंग’ होती.’
फ्री क्लायबिंग
फ्री क्लायबिंग हे रॉक क्लायबिंगचे एक स्वरूप आहे. या ऍडव्हेंचर स्पोर्टस्‌धमध्ये चढणार्‍याला कोणत्याही साहित्याशिवाय, कुठल्याही उपकरणाशिवाय केवळ दोरीच्या मदतीने डोंगरावर चढावे लागते. यात दोरीला बोल्टने बांधतात. मात्र, डोंगरावर बोल्ट ठोकण्यासाठी ड्रील मशिनचा उपयोग करता येत नाही. हातोड्याने हे बोल्ट डोंगरात ठोकून चढाई करावी लागते. (वृत्तसंस्था)