‘दादा की खुशी में अपनी खुशी’

ट्विटरवर सेहवागची फटकेबाजी

0
116

नवी दिल्ली, १९ एप्रिल 
आयपीएल हे युवा क्रिकेटपटूंसाठी उत्तम व्यासपीठ असले तरी या स्पर्धेशी अनेक माजी खेळाडू देखील जोडले गेले आहेत. वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड या दिग्गजांचीही आयपीएलमधील भूमिका महत्त्वाची आहे. वीरू, सचिन, राहुल हे संघांचे मार्गदर्शक म्हणून काम पाहतात तर गांगुली पश्‍चिम बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहे. सेहवाग सध्या आयपीएलमध्ये व्यस्त असला तरी ट्विटरच्या मैदानात त्याची फटकेबाजी नेहमी सुरूच असते.
नुकतेच सेहवागने मुरलीधरनच्या वाढदिवशी त्याला हटके स्टाईलने शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आता वीरूने गांगुलीचे कौतुक करणारे ट्विट केले आहे. खरेतर गांगुलीने धोनीबद्दल केलेल्या वक्तव्यावर सेहवागने उघडपणे आपली असहमती दाखवली होती. त्यावर पडदा टाकण्यासाठी सेहवागने गांगुलीसोबतच्या मैत्रीचा दाखला देण्यासाठी हे ट्विट केल्याचे सांगण्यात येते.
दादा की खुशी में ही अपनी खुशी है, रसगुल्ले जैसी मुस्कान, असे ट्विट सेहवागने केले. ट्विटमध्ये गांगुलीसोबतचा एक छानसा फोटो देखील त्याने शेअर केला. (वृत्तसंस्था)