सचिनचे पत्र व्हायरलले

0
115

नेटकर्‍यांना सापडले
मुंबई, १९ एप्रिल 
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तरी अजूनही त्याची लोकप्रियता कायम आहे. भारतीय क्रिकेटप्रेमी तर त्याला आजही क्रिकेटचा देव मानतात. सचिनच्या अशाच एका चाहत्याने नुकतेच त्याला पत्र लिहिले होते. त्याला सचिननेही हटके उत्तर दिले आहे. विशेष म्हणजे, आपल्या चाहत्याचे हे पत्र सचिनने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
सचिनच्या या चाहत्याचे नाव करण गांधी असे असून, सध्या तो अमेरिकेत वास्तव्याला आहे. वरुणने आपल्या पत्रात सचिनला उद्देशून म्हटलय की, मी तुमचा खेळ पाहूनच लहानाचा मोठा झालो. तुमचा एकदिवसीय सामना पाहण्यासाठी मी माझा अभ्यास वर्गही सोडला होता. सचिनने करणला तत्काळ उत्तर दिले आहे. सचिनने इंस्टाग्रामवर करणचे हे पत्र पोस्ट करून म्हटले की, माझा सामना पाहण्यासाठी तू आपला क्लास सोडलास. पण यामुळे तुझ्या शिक्षकांना ही गोष्ट नक्कीच आवडली नसेल. सचिनचे हे पत्र सध्या सोशल मीडियात कमालीचे व्हायरल होत असून, याला लाखो लाईक्स मिळत आहेत. सचिनने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी अनेकदा संवाद साधला आहे. (वृत्तसंस्था)