रोनाल्डोची हॅट्‌ट्रिक

0
116

रियल माद्रिद चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यफेरीत
माद्रिद, १९ एप्रिल 
रियल माद्रिदचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोच्या हॅट्‌ट्रिकच्या बळावर त्याच्या संघाने चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीत आलपे स्थान निश्‍चित केले आहे. अर्थात रोनाल्डांची हॅट्‌ट्रिक वादग्रस्त ठरली. कारण उपांत्यपूर्व फेरीच्या दुसर्‍या सत्रात १० खेळाडूंसह उतरणार्‍या बायर्न म्युनिखच्या संघाने रोनाल्डोच्या दोन गोलना विरोध दर्शविला होता. अतिरिक्त वेळेत खेळविलेल्या या सामन्यात माद्रिदने म्युनिखला ४-२ ने पराभूत केले. गेल्यावर्षीचा विजेता रियल माद्रिदने ६-३ च्या सरासरीने विजय संपादन केला. यामुळे हा संघ सलग सातव्यांदा उपांत्य फेरीत पोहोचला आहे. हा एक आगळावेगळा विक्रमच आहे.
पहिल्या सत्रात बायर्नला १-२ ने पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, या सामन्यात या संघाने रियल माद्रिदला जबरदस्त आव्हान दिले. रॉबर्ट लेवांडोव्हस्कीने पेनॉल्टीवर केलेल्या गोलमुळे तसेच सर्जियो रामोसच्या आत्मघाती गोलच्या भरवशावर संघाने आघाडी मिळविली होती. आर्टुरो विडालने मैदान सोडल्यानंतर पाचच मिनिटांनी रोनाल्डोने हॅट्‌ट्रिक नोंदविली. बायर्न संघाच्या खेळाडूंनी याला विरोध केला. कारण रोनाल्डोचा दुसरा आणि तिसरा गोल ऑफसाईड होता. मात्र, पंचांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे माद्रिद संघाच्या विजय सुनिश्‍चित झाला. रोनाल्डोने यापूर्वी युरोपीय फुटबॉलमध्ये आपले १०० गोल पूर्ण केले होते. (वृत्तसंस्था)