योगदिनानिमित्त संयुक्त राष्ट्रसंघ काढणार १० टपाल तिकिटे

0
137

न्यूयॉर्क, २० एप्रिल
संयुक्त राष्ट्रसंघाने येत्या २१ जूनच्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने १० टपाल तिकिटे जारी करण्यात येत असल्याचे जाहीर केले असून, या सर्व तिकिटांवर विविध योगासने असतील. योगासाठी एक दिवस जागतिक पातळीवर समर्पित केला जावा यासाठी भारताने महत्त्वाची भूमिका बजावली होती. या तिकिटांवर देवनागरी लिपीतील ॐ अक्षर असेल.
संयुक्त राष्ट्रसंघाकडून जी टपाल तिकिटे जारी केली जातात त्यांचा वापर न्यूयॉर्क, जिनिव्हा, व्हिएन्ना येथील संयुक्त राष्ट्रसंघाच्या केंद्रांकडून आंतरराष्ट्रीय स्तरावरील पाकिटे व पत्रे पाठविण्यासाठी केला जातो. योग तिकिटांचा वापर मात्र अमेरिकी डॉलर्समुळे न्यूयॉर्कमध्येच केला जाईल. जगभरात भारताची प्रतिमा योगप्रणेता देश अशी आहे. पंतप्रधान मोदींनी २०१४ साली भारताची सत्ता हाती घेतल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाकडे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यासाठी आग्रह धरला होता व त्यानुसार २१ जून या दिवसाची त्यासाठी निवड करण्यात आली. (वृत्तसंस्था)