मोबाईलवर पॉर्न पाहणार्‍या महिलांची अधिक संख्या

0
108

नवी दिल्ली, २० एप्रिल 
अश्‍लील साहित्य पाहण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामध्ये आता महिलांचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एका पॉर्न साईटने जाहीर केलेल्या अहवालात मोबाईलवरून पॉर्न कंटेंट पाहणार्‍यांमध्ये महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे.
पॉर्न कंटेंट देणार्‍या ‘पॉर्नहब’ नावाच्या संकेतस्थळाने कंटेंट पाहणार्‍यांचा अभ्यास करून एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यातून मोबाईलवरून पॉर्न पाहणार्‍यांचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे.
डेस्कटॉपवरील ‘विंडोज’ ऑपरेटिंग सिस्टीमपेक्षा मोबाईलवरील ‘अँडड्रॉईड’ ऑपरेटिंग सिस्टीमवरून पॉर्न पाहणार्‍यांचे प्रमाण अधिक असल्याचे अहवालातून समोर आले आहे.
विंडोज’वरून पॉर्न पाहणार्‍यांचे प्रमाण ३७.९१ टक्के तर ‘अँड्रॉईड’वरून हेच प्रमाण ३७.९३ टक्के एवढे आहे.
पॉर्न पाहणार्‍या महिलांचे जगभरातील विविध देशांमध्ये वेगवेगळे प्रमाण आहे. भारतासह स्वीडन, अर्जेंटिना, मेक्सिको या देशांमध्ये एकूण पॉर्न पाहणार्‍यांपैकी महिलांचे प्रमाण ३० टक्के आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये ‘पॉर्नहब’ या संकेतस्थळाला भेट देणार्‍यांपैकी ७२ टक्के जणांनी मोबाईलवरून संकेतस्थळ पाहिले. तर ‘पॉर्नहब’ला भेट देणार्‍या महिलांपैकी ८० टक्के महिलांनी मोबाईलवरून भेट दिली होती. तर यामध्ये पुरुषांचे प्रमाण ६९ टक्के होते.
महिलांचे सक्षमीकरण आणि पुरुषांएवढेच स्वातंत्र्य या कारणांमुळे लोकशाही असलेल्या देशांमधील महिलांचे पॉर्न पाहण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. (वृत्तसंस्था)