औषधांशिवाय रोगमुक्ती देणारी अजब गुहा

0
101

व्हिएन्ना, २० एप्रिल 
आज जगभरात अनेक लोक विविध प्रकारच्या आजारांनी, दुखण्यांनी त्रस्त आहेत व डॉक्टर्स त्यांच्यावर रुग्णालयातून उपचार करत आहेत. मात्र, जगात अशा काही गुहा आहेत जेथे जाऊन औषधांशिवायच रोगमुक्ती मिळविता येते. या गुहेच्या वातावणात प्रवेश करताक्षणीच आजार छू मंतर केल्यासारखे गायब होतात. विकसित राष्ट्रांंच्या यादीत असलेल्या ऑस्ट्रियात अशी गुहा गास्तिन येथे आहे.
या गुहेचा शोध योगायोगानेच लागलेला आहे. वास्तविक येथे सोन्याच्या शोधात लोक आले. मात्र, त्यांना सोन्यापेक्षाही अधिक मौल्यवान चीज येथे मिळाली. या गुहेत अगदी अल्प प्रमाणात नैसर्गिक रित्याच रेडॉन गॅस उर्त्सजित होतो. हा रेडिओऍक्टिव्ह आहे व गुहेच्या गरम वातावरणात रोगी येताच या गॅसमुळे त्यांच्या व्याधी समूळ नष्ट होतात. औषधे न घेताच ही रोगमुक्ती मिळते. या गुहांची प्रसिद्धी वेगाने होत असून युरोप, जर्मनी, मध्ययुरोपमधूनही अनेक लोक उपचारासाठी येथे येतात. विशेष म्हणजे आर्थरायटिस, पॅरालिसिस सारखे घातक आजार बरे होण्याचे प्रमाणही ९० टक्के आहे. हा वैद्यकीय क्षेत्रात चमत्कार मानला जातो.
या गुहेत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलप्रमाणे पांढरा कोट घालून डॉक्टर्सही असतात. रुग्णांसाठी लाकडी बाके टाकली गेली असून येथे काही काळ नुसते पडून राहिले की आजार कमी होत असल्याचा अनुभव रुग्ण घेतात. (वृत्तसंस्था)