आता ‘अशी’ दिसते हसरी, ‘हलकी’ इमान

0
145

मुंबई, २० एप्रिल 
जगातील सर्वात वजनदार महिला म्हणून ओळखल्या जाणार्‍या इजिप्तच्या इमान अहमदचं वजन आता तब्बल २५० किलोंनी कमी झालय्. स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी शस्त्रक्रिया, इतर उपचार, थेरपी आणि विशेष आहार या सगळ्यांचा योग्य समन्वय साधून सैफी हॉस्पिटलचे डॉक्टर मुफ्फी लकडावाला आणि त्यांच्या टीमनं ही किमया करून दाखवली आहे. हा चमत्कार आपल्याला बघता यावा,
यासाठी डॉक्टरांनी इमानचे काही ताजे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. हे व्हिडीओ १८ एप्रिलला रेकॉर्ड करण्यात आलेले आहेत. त्यात ती व्हिलचेअरवर बसून हॉस्पिटलची सैर करीत असल्याचे तसेच डॉक्टरांशी संवाद साधताना, गाणीही ऐकत असल्याचे दिसत आहे. (वृत्तसंस्था)