येथे संपते चीनची लांबच लांब भिंत…

0
202

बीजिंग, २० एप्रिल 
जगातील एक आश्‍चर्य असलेली चीनची भिंत नेहमीच लोकांच्या कुतूहलाचा विषय असते. दोन हजार वर्षांपूर्वी या भिंतीचे काम सुरू झाले होते. अनेक वेळा ती तोडली गेली आणि बांधली गेली. ही भिंत कुठे संपते, याबाबतही लोकांना उत्सुकता असते. चीनच्या किनहुआंग्दाओ शहरात शांघाईजवळ ही लांब भिंत संपते. तिचे शेवटचे टोक बोहाई समुद्राशी जाऊन भिडते.
चीनच्या भिंतीच्या या भागाला लाओलोंगतु किंवा ओल्ड ड्रॅगन हेड या नावाने ओळखले जाते. ड्रॅगन आपले तोंड समुद्रात बुडवत आहे, असे दृश्य तिथे दिसून येते. या भागाचे बांधकाम १५७९ मध्ये मिंग साम्राज्याच्या काळात झाले होते. लाओलोंगतुमध्ये येणार्‍या पर्यटकांसाठी या भिंतीवर अनेक प्रकारची सुंदर कलाकुसर करण्यात आलेली आहे.
चीनची भिंत सर्व कोनांना मिळून एकूण २१ हजार १९६ किलोमीटर लांबीची आहे. सुरुवातीला या भिंतीसाठी लाकूड आणि दगडांचा वापर करण्यात आला होता. नंतर विटांचे बांधकाम करण्यात आले. चंद्रावरूनही ही भिंत दिसते, असा एकेकाळी समज होता, तो अर्थातच चुकीचा आहे, हे नंतर निष्पन्न झाले.(वृत्तसंस्था)