ऋषी कपूरला मुंबई महापालिकेची नोटीस

0
202

मुंबई : मुंबई महापालिकेने अभिनेता ऋषी कपूर यांना नोटीस पाठवली आहे. वांद्र्यातील पाली हिल्समध्ये असलेल्या कृष्णा राज बंगल्यातील वडाच्या झाडाच्या फांद्या परवानगीपेक्षा जास्त कापल्याने ही नोटीस पाठवली आहे. महापालिकेच्या एका अधिकर्‍याने सांगितले की, मागील आठवड्यात ऋषी कपूर यांना झाडाच्या सहा फांद्या छाटण्याची परवानगी दिली होती. इमारतच्या बांधकामात अडचणी येत असल्याने त्यांना परवानगी दिली होती. परंतु निरीक्षण केले असता झाडाच्या जास्त फांद्या कापल्याचे आढळून आले होते. परवानगीचा गैरफायदा घेत झाडाच्या बळकट फांद्या कापल्या. त्यामुळे ऋषी कपूर आणि कंत्राटदारांना नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे, असे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. तुमच्यावर कारवाई का करू नये, अशी विचारणा करत ऋषी कपूर यांना उत्तर देण्यासाठी २४ तासांची मुदत देण्यात आली आहे.