वयाच्या पन्नाशीतही माधुरी दिसते तरुण

0
267

मुंबई :उत्तम अभिनय, एव्हरग्रीन सौंदर्य, मधाळ हास्य या तीन गोष्टी कोणाकडे आहेत असा प्रश्‍न कोणी केला तर त्याचे आपसुकच उत्तर येईल माधुरी दीक्षित. नव्वदीच्या दशकात अभिनय व नृत्याच्या जोरावर बी टाऊनमध्ये धुमाकूळ घालणारी ही अभिनेत्री आजही लाखो लोकांची धक-धक वाढेल इतकी सुंदर दिसते. २० वर्षांपूर्वी जितकी तरुण आणि फ्रेश माधुरी दिसत असे त्यात वयाचा काहीच परिणाम झाल्याचे दिसत नाही. उलट बदलत्या काळानुसार माधुरीने स्वत:ला तेवढेच अपडेट ठेवले आहे. पाश्‍चिमात्य असो किंवा पारंपरिक, माधुरीवर प्रत्येक पेहराव तेवढाच शोभून दिसतो.