गुजरातविरुद्धच्या लढतीतून पूर्ण

0
101

गुण मिळविण्याचा कोलकात्याचा डाव
कोलकाता, २० एप्रिल
इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स आणि तळाच्या स्थानावर असलेल्या गुजरात लॉयन्सविरुद्धची शुक्रवारी होणारी लढत टाळता येणार नाही. कारण फॉर्म आणि नशिबाच्या बाबतीत हे दोन्ही संघात भिन्नता आहे.
कोलकाताने पाच सामन्यांत चार विजयासह गुणतालिकेत एकदम वरच्या स्थानावर आहे, तर गुजरात लॉयन्सची स्थिती एकदम उलट आहे. दोन्ही संघात ही तफावत आहे आणि गुजरातला गुणतालिकेचे हे डोंगर चढणे अवघड आहे. दहा गड्यांनी झालेल्या पराभवाच्या स्मृती घेऊन गुजरात लॉयन्स नव्या दमाने या मोसमात दुसर्‍यांदा केकेआरशी दोन हात करण्यास जात आहे.
गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील केकेआर संघात मनीष पांडेसारखा भरीव योगदान देणारा व युसुफ पठाणसारखा धडाकेबाज फलंदाज आहे. सुनील नारायणसारखे आश्‍चर्यकारक अस्त्र आहे. गोलंदाजीतही नॅथन कटलर निले, उमेश यादव, ख्रिस व्होक्स आणि फिरकीपटू नारायण व कुलदीप यादवही सातत्याने उत्कृष्ट कामगिरी बजावत आहे.
गुजरात लॉयन्सकडे सुरेश रैना, ड्वेन स्मिथ, ब्रेंडन मॅकुलम व ऍरोन फिंच सारखे खेळाडू प्रतिस्पर्ध्यांच्या मनात भीती निर्माण करण्यास पुरेसे आहेत, परंतु गोलंदाजीत फारशी परिश्रम केले नाही. अगदी सुरुवातीच्या सामन्यापासून गुजरातची गोलंदाजी टुकार राहिली आहे. गुजरातला केकेआरकडून पूर्ण १० गड्यांनी पराभव पत्करावा लागला होता. आता आयपीएलच्या दुसर्‍या चरणात गुजरात लॉयन्सला गुणतालिकेत बदल करण्याची आशा आहे. (वृत्तसंस्था)