माझ्यासारखा मीच ः युसुफ

0
115

कोलकाता, २० एप्रिल 
मी विशेष आहे. कुणीही माझ्याशी स्पर्धा करू शकत नाही. माझ्यात विशेष प्रतिभा आहे, असे मी मानतो. मला माझा नैसर्गिक खेळ करण्यापासून कोणी रोखू शकणार नाही आणि मी घाबरणारही नाही, असे युसुफ पठाण एका मुलाखतीदरम्यान म्हणाला.
आयपीएलमध्ये नुकतेच दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धच्या सामन्यात पठाणने केकेआरकडून खेळताना अवघ्या ३९ चेंडूत ५९ धावा काढल्या होत्या.
मला पुन्हा सूर गवसला आहे. परिवर्तनासाठी आता फारसा वेळ लागणार नाही. जर आपल्या उत्कृष्ट कामगिरीत सातत्यता राखली, तर एक वेळा मला निश्‍चितच संधी मिळेल. ही संधी आज नाही, तर उद्या नक्कीच मिळेल, असे सकारात्मक मत मांडत युसुफ पठाणने भारतीय संघात पुनरागमनाबाबतचा आशावाद व्यक्त केला.
मी इतरत्र बघू इच्छित नाही. उत्तम क्रिकेट खेळणे हे माझे कर्तव्य आहे आणि त्याची सुरुवात करण्याची ही चांगली वेळ आहे, असेही तो म्हणाला. कोटला मैदानावर दिल्लीविरुद्धच्या प्रचंड दडपणाखालच्या सामन्यातही मला आपला नैसर्गिक खेळ खेळण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असा त्याने पुनरुच्चार केला. (वृत्तसंस्था)