बोपन्ना-पाब्लोची आगेकूच

0
109

मॉन्टे कार्लो मास्टर्स टेनिस
पॅरिस, २० एप्रिल
रोहन बोपन्नाने उरुग्वेचा आपला जोडीदार पाब्लो क्यूवाससोबत पहिला विजय नोंदवीत मॉन्टे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. अनसीडेड भारत-उरुग्वेच्या जोडीने मार्सिन मेटकोव्हस्की-ऍलेक्झांडर पेया या जोडीला एक तास २७ मिनिटांच्या लढतीत ६-३, ६-७, १०-२ अशी मात दिली.
यापूर्वी बोपन्ना-पाब्लो जोडीला दोन मास्टर्स स्पर्धा इंडियन वेल्स व मियामीच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. पुढील फेरीत बोपन्ना-पाब्लोचा सामना राजीव राम (अमेरिका) व रावेन कलासेन (दक्षिण आफ्रिका) या जोडीविरुद्ध झुंज द्यायची आहे. राम-रावेनला पहिल्या फेरीत बाय मिळाला होता.
पुरुष एकेरीच्या लढतीत ऍण्डी मरेने लक्झमबर्गच्या गाईल्स मूलरला ७-५, ७-५ अशी मात देऊन तिसर्‍या फेरीत स्थान मिळविले. स्वीत्झर्लंडच्या स्टान वावरिंकाने झेक प्रजासत्ताकच्या जिरी व्हर्सेलेवर ६-२, ४-६, ६-२ अशी मात करून तिसरे फेरीतील स्थान सुनिश्‍चित केले. (वृत्तसंस्था)