बार्सिलोना चॅम्पियन्स लीगमधून बाहेर

0
119

बार्सिलोना, २० एप्रिल
गतवेळच्या जादूई कामगिरीची पुनरावृत्ती यंदा बार्सिलोना करू शकला नाही आणि जुव्हेंट्‌सने बार्सिलोनाला बरोबरीत रोखून चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. बार्सिलोनाने पहिल्या चरणात ४-० ने हरविल्यानंतर अंतिम सोळाच्या लढतीत पॅरिस सेंट जर्मेनला ६-१ ने हरवून स्पर्धेत मुसंडी मारली होती.
या वेळी मात्र युव्हेंट्‌सने शानदार संरक्षणात्मक खेळाचे प्रदर्शन करीत बार्सिलोनाला गोल नोंदविण्याची एकही संधी दिली नाही. लियोनेल मेस्सी, लुईस सुआरेज व नेमारसारखे दिग्गज खेळाडूसुद्धा काहीही कमाल दाखवू शकले नाही. नोऊ कॅम्पच्या हिरवळ मैदानावर या लढतीदरम्यान लियोनेल मेस्सी तोंडाच्या भारावर पडला. याबरोबरच बार्सिलोना या स्पर्धेतून बाहेर झाला. याबरोबरच जुव्हेंट्‌सने २०१५ चॅम्पियन्स लीग अंतिम सामन्यात मिळालेल्या पराभवाचा वचपा काढला.
चॅम्पियन्स लीग कोण जिंकणार?
तब्बल १२० सामन्यांत दर्जेदार फुटबॉल खेळ आणि अनेक नाट्यमय घडामोडींचा अनुभव, आनंद घेतल्यानंतर चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत आता चार दिग्गज संघ विजेतेपदाच्या शर्यतीत आहेत. युव्हेंट्‌स संघापूर्वी रियाल माद्रिद, ऍटलेटिको माद्रिद व मोनॅको संघांनी उपांत्य फेरीत आपले स्थान आधीच सुनिश्‍चित केलेले आहे. उपांत्य फेरीचा ड्रॉ शुक्रवारी सकाळी काढण्यात येणार आहे. उपांत्य फेरी पहिले चरण २ व ३ मे रोजी, तर उपांत्य फेरीचे दुसरे चरण ९ व १० मे रोजी होणार आहे. अंतिम सामना ३ जून रोजी कार्डिफ येथे खेळला जाणार आहे. (वृत्तसंस्था)