पॅरिस गोळीबाराची जबाबदारी इसिसने स्वीकारली

0
180
Paris : Police unions representatives pays respect for the police officer killed in Thursday's attack , on the Champs Elysees boulevard in Paris, Friday, April 21, 2017. France began picking itself up Friday from another deadly shooting claimed by the Islamic State group, with President Francois Hollande convening the government's security council and his would-be successors in the presidential election campaign treading carefully before voting this weekend. AP/PTI(AP4_21_2017_000089B)

पॅरिस, २१ एप्रिल 
मध्य पॅरिसमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या गोळीबाराची जबाबदारी इसिसने स्वीकारली आहे. या हल्ल्यात एक पोलिस अधिकारी ठार झाला असून, दोघे गंभीर रीत्या जखमी झाले आहेत.
फ्रान्समध्ये २३ एप्रिलला राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फॅ्रन्कॉईस ओलांद यांनी हा गोळीबार दहशतवादाचा प्रकार असल्याचे स्पष्ट केले आहे.
पॅरिसच्या चॅम्पस इलीसीस परिसरात ही गोळीबाराची घटना घडली. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी लगेच हा परिसर रिकामी केला. गोळीबारात हल्लेखोरही ठार झाला. पोलिसांनुसार, हल्लेखोरांची ओळख पटली असून, अधिक तपास सुरू आहे. फ्रान्समध्ये धोकादायक इसम घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर फ्रान्स पोलिसांनी गुरुवारी अटक वॉरंट जारी केले होते. हल्लेखोर बेल्जियमहून रेल्वेगाडीने फ्रान्समध्ये आला होता.
 (वृत्तसंस्था)