मार्शल आर्टमध्ये आकाश विश्‍वासला सुवर्णपदक

0
129

घोट, २१ एप्रिल 
सुभाषग्राम येथील रहिवासी आकाश सपन विश्‍वास याने थायलंड येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले. त्याच्या या यशामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
आकाश विश्‍वास सद्यस्थितीत नागपूर येथील शतायू महाविद्यालयामध्ये बीबीए प्रथम वर्षामध्ये शिक्षण घेत आहे. यापूर्वी त्याने नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील मार्शल आर्ट स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त केले होते. गोवा येथे झालेल्या स्पर्धेत त्याने कांस्यपदक पटकाविले होते.
त्याची थायलंड येथे आयोजित आंतरराष्ट्रीय मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये भारतीय संघामध्ये निवड झाली होती. त्याने या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले. त्याचे वडील पोलिस विभागात सहायक पोलिस निरीक्षक म्हणून ठाणे (मुंबई) येथे कार्यरत आहेत. मार्शल आर्ट स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी घेतल्याबद्दल आकाश विश्‍वासचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे. (तभा वृत्तसेवा)