स्टील आयातीत ३६ टक्क्यांनी घट

0
78

नवी दिल्ली, २१ एप्रिल 
२०१६-१७ या आर्थिक वर्षात देशाच्या स्टील आयातीत ३६ टक्क्यांनी घसरण झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात ७.४ दशलक्ष टन स्टीलची आयात करण्यात आली होती. या समान कालावधीत स्टीलची निर्यात १०२ टक्क्यांनी वाढत ८.२ दशलक्ष टनावर पोहोचली आहे. २०१६-१७ मध्ये समाधानकारक उत्पादन घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. २०१५-१६ मध्ये ४ दशलक्ष टनची निर्यात करण्यात आली होती. त्यामध्ये वाढ होत १०२.१ दशलक्ष टनावर निर्यात पोहोचली. चीन आणि जपान या देशानंतर स्टील उत्पादनात भारताचा तिसरा क्रमांक लागतो. आगामी काळात स्टील उत्पादनाच्या बाबतीत दुस़र्‍या स्थानी पोहोचण्याचा भारताचा प्रयत्न आहे. (वृत्तसंस्था)