बोपन्ना-पाब्लोची उपांत्यपूर्व फेरीत धडक

0
96

मॉण्टे कार्लो मास्टर्स टेनिस
पॅरिस, २१ एप्रिल
भारताच्या रोहन बोपन्ना व त्याचा उरुग्वेचा सहकारी पाब्लो कुव्हासने येथे आयोजित मॉण्टे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. बोपन्ना व पाब्लोने उप-उपांत्यपूर्व लढतीत राव्हेन क्लासेन व राजीव राम या जोडीला पराभूत केले.
पहिला सेट गमावल्यानंतर बोपन्ना-पाब्लोने मुसंडी मारीत ६-७(६), ६-४, १०-६ असा सामना जिंकला. अंतिम आठ फेरीच्या सामन्यात बोपन्ना-पाब्लोचा सामना फिनलॅण्डच्या हेनरी कोंटिनेन व ऑस्ट्रेलियाच्या जान पिअर्स या अव्वल सीडेड जोडीशी होऊ शकते. कोन्टिनेन-पिअर्सने आपल्या दुसर्‍या फेरीत सर्बियाच्या नोवाक जोकोविच व व्हिक्टर ट्रायोस्कीच्या
जोडीला ६-३, ६-४ असा विजय नोंदविला. (वृत्तसंस्था)
नोवाक जोकोविच अंतिम आठमध्ये
मॉण्टे कार्लो, २१ एप्रिल 
नोवाक जोकोविचनेसस्पेनच्या पाब्लो कॅरेनो बुस्टावर ६-२, ४-६, ६-४ असा विजय नोंदवून मॉण्टे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. द्वितीय विश्‍वमानांकित जोकोविचला उपांत्य फेरीत बेल्जियमच्या डेव्हिड गॉफिनविरुद्ध झुंज द्यायची आहे. प्रथम विश्‍वमानांकित ऍण्डी मरेला तिसर्‍या फेरीतच स्पेनच्या अल्बर्ट रामोजकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. माजी फ्रेन्च ओपन विजेता स्टॅन वावरिंकासुद्धा पाब्लो कुव्हासकडून पराभूत झाला. राफेल नदालने अलेक्झांडर झेव्हरेव्हचा ६-१, ६-१ असा पराभव केला.