संशोधक प्रा. रामनाथ चव्हाण यांचे पुण्यात कर्करोगाने निधन

0
84

पुणे, २१ एप्रिल 
दलित साहित्य आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील लेखक म्हणून ओळखले जाणारे प्रा. रामनाथ चव्हाण यांचे गुरुवारी पुण्यात कर्करोगामुळे निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी शीला, मुले सागर व समीर असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. साहित्य, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते.
कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका, व्यक्तिचित्रे, भटक्या-विमुक्तांच्या संदर्भातील संशोधनात्मक लेखन अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये प्रा. रामनाथ चव्हाण यांनी ठसा उमटवला होता. पुणे विद्यापीठाच्या अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे ते प्रमुख होते. बिकट परिस्थितीतून मार्ग काढत रामनाथ चव्हाण यांनी साहित्य विश्‍वात स्वतःची छाप पाडली होती.
भटक्या-विमुक्तांचे अंतरंग, जाती-जमाती, भटक्या-विमुक्तांची जातपंचायत (खंड १ ते ४), घाणेरीची फुले या त्यांच्या साहित्यकृतींना वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. आधारस्तंभ आणि पारख ही त्यांनी लिहिलेली नाटकेही गाजली होती.
प्रा. चव्हाण यांनी आपल्या साहित्यातून ठामपणे भूमिका मांडली. भटकणार्‍या समाजाच्या वेदना साहित्यातून समाजासमोर आणल्या. साहित्याच्या माध्यमातून ते कायमच आपल्याबरोबर असतील, अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनावर कार्यरत असताना त्यांनी गावागावांत जाऊन साहित्याच्या माध्यमातून भूमिका मांडली. त्यांनी बहुमूल्य लेखन केले. त्यांनी विद्यापीठात दिलेले
योगदान न विसरण्याजोगे आहे, या शब्दात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी शोकसंवेदना व्यक्त