डॉ. आंबेडकर राष्ट्रीय मेधा पुरस्काराचा रूपेश ठरला मानकरी

0
137

अकोला,२३ एप्रिल
स्थानिक मलकापूर परिसरातील रहिवासी व आरएलटी विज्ञान महाविद्यालयातील बारावीचा गुणवत्ता यादीतील विद्यार्थी रूपेश अनिल वानखडे याला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीने दिला जाणारा डॉ. आंबेडकर राष्ट्रीय मेधा पुरस्कार मिळाला. या पुरस्कारासह त्याला साठ हजार रुपयांचा धनादेश बहाल करण्यात आला आहे.
रूपेश हा मुंबई येथील सेठ जीएस केईएम वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस करीत आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या डॉ आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने बहुजन मागास समाजातील इयत्ता बारावीतील गुणवत्ताप्राप्त विध्यार्थ्यांना डॉ. आंबेडकर राष्ट्रीय मेधा पुरस्कार दरवर्षी दिल्या जातो.
रूपेश हा गत वर्षी आरएलटी विज्ञान महाविद्यालयातून बारावीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून प्रथम मेरिट आला होता. त्याची दखल घेऊन त्याला हा मानाचा मेधा पुरस्कार बहाल करण्यात आला. हा पुरस्कार मिळविणारा रूपेश हा विभागातून प्रथम लाभार्थी आहे.
दिल्ली येथील स्टेन ऑडिटोरियममध्ये नुकत्याच झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात रूपेशला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्रीकृष्ण पाल गुर्जर, ना. विजय सापला, ना. रामदास आठवले आदींच्या उपस्थितीत राष्ट्रीय मेधा पुरस्कार व साठ हजार रुपयांचा धनादेश बहाल करून त्याचा गौरव करण्यात आला. रूपेशचे वडील जिल्हा न्यायालयात कार्यरत असून तो आपल्या यशाचे श्रेय आपले वडील, आई रत्नमाला, आजोबा उत्तमराव वानखडे, प्राचार्य डॉ.विजय नानोटी याना देतो. (तभा वृत्तसेवा)