माजी राज्यमंत्री केवलचंद जैन यांचे निधन

0
153

गोंदिया : माजी राज्यमंत्री व स्वातंत्र्य संग्राम सेनानी केवलचंद जैन यांचे वृद्धापकाळाने २ ऑक्टोबर रोजी दुपारी निधन झाले. मृत्युसमयी ते ९० वर्षांचे होते. उद्या ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या अशोक कॉलनी येथील निवासस्थानावरून अंत्ययात्रा निघणार आहे.
जैन यांनी देहदानाचा संकल्प केल्यामुळे गोंदिया शासकीय महाविद्यालयाला त्यांचा देह सोपविण्यात येणार आहे. जैन हे सन १९८२-८३ या कालावधीत राज्याचे ऊर्जा, नियोजन, उत्पादन शुल्क व संसदीय कार्य अशा पाच विभागांच्या खात्याचे राज्यमंत्री होते. त्यांच्या मागेे चिरंजीव सी. ए. विनोद जैन व दोन मुली, नातवंड असा बराच आप्त परिवार आहे.