प्रभास आणि कॅटरिना एकत्र

0
160

मुंबई : बाहुबली फेम अभिनेता प्रभाससोबत बॉलीवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ दिसणार असल्याची माहिती आहे. प्रभासचा आगामी चित्रपट ‘साहो’चा ट्रेलर ‘बाहुबली-२’ सोबत प्रदर्शित करण्यात आला होता. साहोमध्ये कॅटरिनाचीही भूमिका असल्याचे सांगण्यात येते. कॅटरिना सध्या तिचा आणि सलमान खानचा आगामी चित्रपट ‘टायगर जिंदा है’ च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. शिवाय ती ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मध्ये आमीर खानसोबतही दिसणार आहे. त्यातच ती आता प्रभासच्या सोहोमध्येही दिसणार असल्याची माहिती आहे. ‘साहो’ हा प्रभासचा ऍक्शन थ्रिलर चित्रपट आहे. ज्यात प्रभास रोमँटिक भूमिकेत असेल. २०१८ मध्ये हा प्रदर्शित होईल.