‘पाठक बाईं’वर शुभेच्छांचा पाऊस…

0
205

मुंबई : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून अल्पावधीतच पाठक बाईंनी प्रेक्षकांची मनं जिंकलीत. या पाठक बाईंचा अर्थातच अक्षया देवधर हिचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्यावर सोशल मीडियातून शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ मधील शाळेतील एका शिक्षिका असलेली अंजली आणि पैलवान असलेला राणा दा यांच्या जोडीने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. मूळची पुण्याची असलेल्या अक्षयाने थिएटर ग्रुपच्या नाटक कंपनीतून आपल्या करीअरला सुरुवात केली. बिनकामाचे संवाद, दर्शन, संगीत मानापमान या नाटकांतूनही तिने अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.