हा अंध छायात्रिकार पाहतो मनाच्या दृष्टीने

0
152

मॉस्को, १४ मे 
रशियातील हा छायाचित्रकार मनाच्या दृष्टीने पाहतो. छायाचित्रकार अलेक्झांडर झुराव्ल्योफ म्हणतात, की ते कोणतेही दृश्य डोळ्यांनी नव्हे तर आत्म्याच्या खोलीत अनुभव करतात. मनाच्या डोळ्यांनी ते कोणतेही दृश्य अनुभवू शकतात. अलेक्झांडर ११ वर्षांचे होते तेव्हा त्यांची ९८ टक्के नजरेची क्षमता गेली होती.
आता केवळ रंग, आकार, प्रकाश आणि अंधकार एवढेच त्यांना जाणवतात. अंध छायाचित्रकार अलेक्झांडर झुराव्ल्योफ म्हणतात, मला कोणत्याही वस्तूचा आकार दिसतो. क्वचित पूर्णपणे स्पष्ट आकारही दिसत नाही, परंतु मी मनामध्ये त्या आकाराची कल्पना करतो. खोल मनामध्ये त्या दृश्याचा अनुभव घेण्याचा मी प्रयत्न करतो. डोळ्यांमधील दृष्टी गेल्यावर त्यांची श्रवणशक्ती व वास आणि चव घेण्याची शक्ती खूप वाढली आहे. याच गुणांच्या जोरावर ते कोणत्याही वस्तूचा अनुभव घेतात. लहान होतो तेव्हा सगळे काही चांगले पाहता येत होते.
आता छायाचित्रे घेताना त्याचा दृश्यांची कल्पना करतो. कधी कधी तर विसरूनच जातो की मला काहीही दिसत नाही. मनाची ही कल्पना छायाचित्रे घेताना मला खूप मदत करतात, असे ते म्हणतात. अलेक्झांडर सतत देश-परदेशाचा प्रवास करतात. याच प्रवासादरम्यान त्यांनी छायाचित्रे काढण्यास सुरूवात केली. ते म्हणतात, आधी मी प्रवास करायचो तेव्हा सगळी दृश्ये मनात साठवून ठेवायचो. मात्र नंतर मला वाटले, की मनात असलेली ही दृश्ये मी इतरांनाही दाखवावीत. हळूहळू त्यांनी मनातील भीती दूर केली दूर दूर प्रवास करून छायाचित्रे काढू
लागले. (वृत्तसंस्था)