नेत्रदीपक दगडांमध्ये कोरलेले मादाइन सालेह

0
143

दुबई, १५ मे 
नेत्रदीपक दगडांमध्ये कोरण्यात आलेल्या नक्षीकामासाठी सौदी अरेबियातील मादाइन सालेह हे प्राचीन शहर ओळखले जाते. ‘नाबाटेअन’ नावाची जमात या शहरात राहायची. त्यांच्याबद्दल जास्त माहिती मिळाली नसती तरी ही जमात प्रतिभासंपन्न व कलासक्त होती, असे म्हटले जाते. या शहरातील वास्तुंनी तसेच अत्यंत सुशोभित मंदिरे व थडग्यांमुळे जगभरात नावलौकिक मिळविला आहे.
या जागेचे युनेस्कोने पुनरुत्थान केले नसते तर ही जागा संपूर्ण जगासाठी अज्ञातच राहिली असती. या जागेला युनेस्कोने जागतिक वारशाचा दर्जा दिला आहे. येथे पोहोचणे वाटते तितके सोपे नाही. प्रवाशांना प्रथम सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे जावे लागते. नंतर मेडिना तेथून पुन्हा चार तासांचा प्रवास करून मग मादाइन सालेह येथे प्रवाशी पोहोचू शकतात. (वृत्तसंस्था)