३.४८ अब्ज वर्षांपूर्वीच्या जिवाचे मिळाले अवशेष

0
175

लंडन, १४ मे 
ऑस्ट्रेलियात ३.४८ अब्ज वर्षांपूर्वीच्या पर्वतरांगात जीवनाचे पुरावे मिळाले आहेत. येथे मिळालेले अवशेष हे जगात आजपर्यंत सापडलेल्या जीवाश्मांच्या अवशेषांपेक्षा प्राचीन आहेत. या शोधामुळे प्राचीन जीवन कसे होते, या विषयीच्या संशोधनाला बळ मिळणार आहे.
असे मानण्यात येते की, पृथ्वीवर २.९० अब्ज वर्षांपूर्वी जिवाची उत्पत्ती झाली होती. ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी पिलबारा क्षेत्रात ३.४८ अब्ज वर्षांपूर्वीचे अवशेष शोधले आहेत. यापूर्वी पृथ्वीवरील २.७ ते २.९ अब्ज वर्षांपूवींच्या सूक्ष्मजिवाचे अवशेष मिळाले होते. हे अवशेष दक्षिण आफ्रिकेत मिळाले होते. या अवशेषांच्या आधाराने २.९० अब्ज वर्षांपूर्वी जीवनाची उत्पत्ती झाली; असे मानण्यात येत होते. मात्र, ऑस्ट्रेलियात सापडलेले अवशेष हे अवशेष दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या अवशेषांपेक्षाही प्राचीन आहेत. यामुळे जीवनाची उत्पत्ती ३.४८ अब्ज वर्षांपूर्वी झाल्याचा आता दावा करण्यात येण्याची शक्यता आहे.
पिलभारामधील पर्वतीय भागात आढळलेल्या अवशेषांमुळे जीवनाच्या उत्पत्तीसंबंधी गूढ उकलणे शक्य होणार आहे. मात्र, जीवनाची उत्पत्ती सखल तलावात झाली की खोल समुद्रात? यावर संशोधकांचे अद्याप एकमत झालेले नाही. मात्र, ऑस्ट्रेलियात सापडलेल्या अतिप्राचीन अवशेषामुळे जीवनाची उत्पत्ती नेमकी कशी व कोठे
झाली? यावर प्रकाश पडण्यास मदत होईल. (वृत्तसंस्था)