मुंबईकरांनी अनुभवला शून्य सावली दिन

0
44

मुंबई, १५ मे 
माणसाच्या कायम सोबत असलेली सावलीही आज सोमवारी काही वेळासाठी लुप्त झाली होती. सूर्य जेव्हा बरोबर डोक्यावर आला तेव्हा ही सावली हरवली. दुपारी १२ वाजून ३४ मिनिटे ते १२ वाजून ४६ मिनिटांदरम्यान शून्य सावलीचा अनुभव अनेक मुंबईकरांनी घेतला असल्याची माहिती मुंबईच्या नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांनी दिली आहे.
हे वातावरणात सतत होणार्‍या बदलांमुळेच शक्य झाले असून, वातावरणातील अनाकलनीय बदल हा दिवसेंदिवस विध्वंसाकडे घेऊन जात आहे. ठराविक काळानंतर पडणारा दुष्काळ, शहरासह देशभरात वाढत जाणारे तापमान आणि मोठ्या प्रमाणातील प्रदूषणसुद्धा येऊ घातलेल्या विध्वंसकतेला तितकेच कारणीभूत असल्याची माहिती
मुंबई वेधशाळेचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे. (वृत्तसंस्था)