लग्नासाठी घटवले २७२ किलो वजन

0
182

वॉशिंग्टन, १५ मे
एका गलेलठ्ठ जोडप्याने लग्न करण्यासाठी एकत्रितपणे २७२ किलो वजन कमी केले आहे. हे दोघे न्यूयॉर्कमध्ये विवाहबंधनात अडकले. रोनी ब्रॉवर आणि अँड्रीया मॅसेला असे या जोडप्याचे नाव होते. चार वर्षांपूर्वी रोनी ब्रॉवर याचे वजन ३०६ किलो आणि मॅसेलाचे वजन२०७ किलो होते.
तू लठ्ठपणा कमी केला नाहीस तर तिशीच्या आधी मरशील, असे त्याला डॉक्टरने सांगितले होते. गेली चार वर्षे हे दोघे वजन कमी करण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करत होते. रोनी आणि अँड्रीया हे दोघेही वाढत्या वजनाने त्रस्त होते. आपले वजन कमी करण्यासाठी रोनीने जिमला जाणे सुरू केले. तेथे त्याची भेट मॅसेला हिच्याशी झाली. तेथेच त्यांची मैत्री झाली व प्रेमही. मग दोघांनी एकमेकांशी करार केला होता. या करारानुसार, दोघांचेही वजन कमी होत नाही तोपर्यंत ते एकमेकांशी लग्न करू शकणार नव्हते. या दोघांनी मिळून २७२ किलो वजन कमी केले. एकट्या रोनीचेच २०४ किलो वजन कमी झाले आहे. त्यानंतर दोघांनीही आपले संपूर्ण लक्ष वजन कमी करण्यावर केंद्रित केले. ब्रॉवर सध्या दोन ठिकाणी नोकरी करत आहे. आता लोक लठ्ठपणा कमी करण्यासाठी त्याला सल्ला मागायला येतात. रोनी म्हणतो, लोक माझ्याकडे येतात आणि वजन कमी करण्याचा सल्ला मागतात. मी त्यांना एवढेच म्हणतो की, डोके चालवून काम केल्यास काहीही अशक्य नाह(वृत्तसंस्था)