पंतप्रधानांवर तयार होणार बायोपिक

0
161

मुंबई : सध्या बायोपिक चित्रपटांचा ट्रेंड बॉलीवूडमध्ये सुरू असून, अशा दोन चित्रपटांची घोषणा काही दिवसांपूर्वीच झाली आहे. आता आणखी एका बायोपिकबाबत माहिती समोर येत आहे. अभिनेते परेश रावल यांनी हा खुलासा केला आहे. परेश रावल यांनी ट्विटरवर एका प्रश्‍नाचे उत्तर देताना हे नक्की केले की, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बनणार्‍या चित्रपटाचा भाग असणार आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीत परेश रावल यांनी नरेंद्र मोदींचे समर्थन करत अनेक सभा घेतल्या होत्या. सध्या ते मोदींच्या खूपच जवळचेदेखील मानले जातात. त्यांनी एकदा असेदेखील म्हटले होते की, माझ्या ऍक्टिंगच्या करिअरमध्ये नरेंद्र मोदींची भूमिका करणे एक निर्णायक आणि वेगळीच छाप सोडणारा क्षण असेल.