‘सिमरन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

0
168

मुंबई : बॉलीवूडची क्वीन कंगना राणावतच्या आगामी ‘सिमरन’ या चित्रपटाचा पहिला टीझर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केले आहे. चित्रपटाच्या पहिल्या टीझरमध्ये कोणतेही संवाद नाहीत. कंगना एक मिनिटाच्या या टीझरमध्ये वेगवेगळ्या अंदाजात भरपूर मजा-मस्ती करताना दिसते. एका ‘हाऊसकीपर’ महिलेची भूमिका ‘सिमरन’मध्ये कंगना साकारणार असून, तिचे नाव प्रफुल्ल पटेल असल्याची चर्चा आहे. दिग्दर्शक हंसल मेहता यांनी आतापर्यंत चित्रपटाच्या कथेसंदर्भात कोणताही खुलासा केलेला नाही.