माधुरीची हाफ सेन्च्युरी

0
177

मुंबई : माधुरी दीक्षित हे नाव जरी उच्चारलं तरी बोलके डोळे, मधुर हास्य, कमरेचे लटके-झटके, थिरकती पावलं, अंगात प्रचंड ऊर्जा आणि मोहक चेहरा डोळ्यासमोर येतो. अभिनय, नृत्य, हाव-भाव, संवादफेक, ग्लॅमर, कॅमेर्‍याची उत्तम जाण असलेल्या या अभिनेत्रीने आज ५०व्या वर्षात पदार्पण केले आहे. तिने बॉलीवूडमध्ये झपाट्याने यशोशिखर गाठून चित्रपटसृष्टीत नावलौकिक मिळविले. १९८४ मध्ये प्रदर्शित ‘अबोध’ चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तेजाब, हम आप के है कोन, देवदाससारख्या चित्रपटातून तिने उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. मागील वर्षी तिचा ‘गुलाब गँग’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.