आयडियाला ४०० कोटींचा फटका

0
112

मुंबई, १५ मे 
रिलायन्स जिओच्या आगमनानंतर टेलिकॉम क्षेत्रातील मोठ-मोठ्या कंपन्यांना फटका बसला आहे. आयडिया सेल्युलर कंपनीला २०१६-१७ च्या चौथ्या तिमाहीत तब्बल ३२८ कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे.
२०१६-२०१७ या आर्थिक वर्षात आयडिया सेल्युलरला एकूण ४०० कोटींच्या तोट्याला सामोरे जावे लागले आहे. २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत आयडिया सेल्युलरने ४५२ कोटींच्या नफ्याची नोंद केली होती. शिवाय, गेल्या आर्थिक वर्षात आयडिया सेल्युलरचा नफा २ हजार ७२८ कोटी होता.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अहवालानुसार, २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात १४.३ टक्क्यांची घट झाली असून, चौथा तिमाहीत ८ हजार १२६ कोटींच्या महसुलाची नोंद झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत ९ हजार ४७८ कोटींच्या महसुलाची नोंद झाली होती.
२०१६-१७ मध्ये आयडिया सेल्युलरचा महसूल ३५ हजार ५७६ कोटी असून, २०१५-१६ मध्ये ३५ हजार ९४९ कोटी इतका महसूल होता.
दरम्यान, बिर्ला समूहाने आपली टेलिकॉम कंपनी आयडियाला व्होडाफोनमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. २०१८ मध्ये या विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे. (वृत्तसंस्था)