ब्रिटनच्या शाळेत विद्यार्थीही घालणार स्कर्ट

0
187

ब्रिटन, १६ मे 
ब्रिटनमधील एका प्रतिष्ठित शाळेमध्ये विद्यार्थ्यांनाही स्कर्ट घालण्याची अनुमती देण्याचा विचार चालू आहे. मुलांच्या मनातील लैंगिक भेदभाव समाप्त करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात येत असल्याचे शाळेचे म्हणणे आहे. उत्तर लंडनमध्ये असलेल्या हायगेट स्कूल ही शाळा हे पाऊल उचलत आहे, असे एका वृत्तपत्राने म्हटले आहे.
‘‘आपण प्रत्येक गोष्ट खरोखर दोन-दोनच्या जोड्यांमध्ये पाहत आहोत का, असा प्रश्‍न सध्याची पिढी विचारत आहे,’’ असे या शाळेचे मुख्याध्यापक एडम पेट्टिट यांनी वृत्तपत्राला सांगितले. स्कर्ट घातल्याने काही मुले आनंदित झाली तर ती चांगलीच गोष्ट ठरेल, असे ते म्हणाले.
सध्या हायगेट स्कूलच्या विद्यार्थिनी करड्या रंगाची पँट, गडद निळ्या रंगाचे जॅकेट आणि टाय घालतात. परंतु विद्यार्थ्यांना मातकट रंगाचा स्कर्ट घालण्याची परवानगी नाही. तसेच १६ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय त्यांना कानातले डूल घालण्याचीही परवानगी नाही. अर्थात हा निर्णय घेण्यापूर्वी पालकांशी चर्चा करण्यात येईल, असे पेट्टिट यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)