पुरुषांचा छळ करून ती कमवते लाखो रुपये

0
394

ब्रिटन, १६ मे
ब्रिटनच्या सरे भागातील एरी मॅक्टेन्सी ही तरुण महिला घरबसल्या अक्षरशः लाखो रुपयांची कमाई करते आहे. तिचा हा व्यवसाय तिच्या स्वतःच्या कल्पनेतूनच सुरू झाला असून, एरी चक्क पुरुषांचा छळ करून त्याबदल्यात तासाला १७५ पौंडांची फी आकारते आहे. या व्यवसायामुळे तिला वेगळे काही तरी करायचे समाधान मिळतेच आहे, पण घटस्फोटावरच्या पायरीवर पोहोचलेले अनेक विवाह त्यामुळे बचावले आहेत, असाही तिचा दावा आहे. एरीकडे छळ करून घेण्यासाठी जे पुरुष येतात त्यांना ती चाबकाने फोडून काढते, चपलेने बडवते, स्वतःचे बूट चाटायलाही लावते.
३१ वर्षांच्या एरीने हा व्यवसाय तिच्या १९ व्या वर्षापासूनच सुरू केला आहे. पहिल्या ग्राहकाकडून तिला त्यासाठी २५ पौंडांची कमाई झाली होती. आता दर महिना तिच्याकडे किमान २० ग्राहक येतात. एरी सांगते, एकदा टॉर्चर झालेला पुरुष महिलांना टॉर्चर होताना काय त्रास होत असेल याची कल्पना करू शकतो व त्यामुळे महिलांबद्दल त्याला अधिक सन्मान निर्माण होतो व यामुळेच लग्न मोडण्याच्या विचारापासून ते दूर होतात. एरी म्हणते, पुरुषांनाही बरेच वेळा स्वतःचा छळ करून घ्यायचा असतो; मात्र त्यांची बायको ते काम करू शकत नाही, असे लक्षात आल्यावर तिने हे करीअर म्हणून स्वीकारायचा निर्णय घेतला.
एरी तिच्या बॉयफ्रेंडचा छळ मात्र अजिबात करत नाही. ती सांगते, मी ओपन माईंडेड आहे. मात्र मला अंधविश्‍वास व फँटसीबद्दल अपार कुतूहल व रस आहे. (वृत्तसंस्था)