व्हेंडिंगमधून मिळतात लक्झरी कार

0
172

सिंगापूर, १६ मे
जगभरात गोळ्या, चॉकलेटांपासून ते कोल्ड्रिंकपर्यंत अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ, अशा अनेक वस्तू या मशिनमधून मिळतात. दुबईसारख्या ठिकाणी तर सोने देणार्‍या व्हेंडिंग मशिन्सही आहेत.
सिंगापूरमध्ये व्हेंडिंग मशिन्समधून लक्झरी कार्स खरेदी करता येत आहेत. ओटोबेन मोटर्सच्या शोरूममध्ये फेरारी, बेंटले, लोंबार्गिनीसारख्या कार्स व्हेंडिंग मशिनमधून खरेदी करण्याची सुविधा दिली गेली असून, या कार्स वापरलेल्या म्हणजे सेकंडहँड आहेत. डिसेंबरमध्ये १५ मजली शोरूम सुरू झाले असून, येथे ८ विविध श्रेणीतील कार उपलब्ध आहेत.
ग्राहक तळमजल्यावरच टच स्क्रीनच्या साहाय्याने कार पाहून आपल्या पसंतीची कार निवडू शकतात व अक्षरशः दोन मिनिटांमध्ये ग्राहकासमोर ती कार हजर केली जाते. शोरूममधील अधिकारी गेरी हांग सांगतात, व्हेंडिंग मशिनचा उद्देश उपलब्ध जागेचा अधिकाधिक वापर करता यावा यासाठी केला जात आहे. सिंगापूरमध्ये जमिनीची उपलब्धता कमी आहे त्यामुळे कार स्टोरेजसाठी जागा मिळणे अवघड बनते.
या शोरूममध्ये १९५५ च्या मॉर्गन प्लस फोरसारख्या स्पोर्ट्‌स कार्सही आहेत. अर्थात व्हेंडिंग मशिनमधून कार देणारे जगातले हे पहिले केंद्र नाही. अमेरिकेतील कारवाना कंपनीने मार्चमध्ये ८ मजली शोरूम सुरू केले आहे व तेथेही व्हेंडिंग मशिनमधून कार्स मिळतात. हे केंद्र टेक्सास येथे सेंट एंटोनिओ येथे उघडले गेले आहे. (वृत्तसंस्था)