रणबीर साकारणार आणखी एक बायोपिक

0
142

मुंबई : बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर हा संजय दत्तवर येणार्‍या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारत असून, तो आणखी एका बायोपिकमध्ये दिसण्याची शक्यता आहे. हा चित्रपट स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख व्यक्तींपैकी एक असलेल्या उधमसिंग यांच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. दिग्दर्शक सुजित सरकार हा ‘पिंक’ चित्रपटानंतर बराच चर्चेत आला असून, आता त्याचा पुढचा चित्रपट हा उधमसिंग यांच्या आयुष्यावर असणार असल्याचे त्याने जाहीर केलंय.