बाहुबली गेमही हिट

0
175

मुंबई : बाहुबली-२ प्रदर्शित झाल्यानंतर व बाहुबलीच्या लोकप्रियतेने जगभरात अनेक विक्रम नोंदविले असतानाच या चित्रपटानंतर ‘बाहुबली द गेम’ हा खेळ प्रदर्शित करण्यात आला होता व या खेळानेही अफाट लोकप्रियता मिळविली आहे. गुगल प्ले स्टोअर्सवर ४५ एमबीचा हा खेळ मोफत उपलब्ध केला गेला असून, आतापर्यंत एक महिन्यातच १० लाख जणांनी तो डाऊनलोड केला आहे. हा खेळ ऍण्ड्राईड ४ व त्यावरच्या व्हर्जन असलेल्या फोनवर खेळता येतो. हा खेळ येण्यापूर्वीही बाहुबलीचे अनेक खेळ आले आहेत मात्र ‘बाहुबली द गेम’ची लोकप्रियता या सार्‍या खेळांपेक्षाही अधिक आहे, असे प्ले स्टोअर्सकडून सांगितले जात आहे.