दीप्ती-पूनमने जयसूर्या थरंगाचाही विक्रम मोडला

0
89

नवी दिल्ली, १६ मे
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या गड्यासाठी सर्वाधिक धावांची विश्‍वविक्रमी भागीदारी करणार्‍या भारतीय महिला क्रिकेटपटू दीप्ती शर्मा व पूनम राऊतला स्वतःच्या विक्रमतोड भागीदारीबाबत अनभिज्ञ होत्या. सामना संपल्यानंतर सुमारे दोन तासांनंतर जेव्हा या दोन्ही खेळाडूंनी भारतीय महिला संघाच्या व्हॉट्‌सऍपवर आलेल्या अभिनंदनाचे संदेश बघितले तेव्हा त्यांना आपल्या उपलब्धीची माहिती मिळाली.
सोमवारी दीप्ती शर्मा (१८८) व पूनम राऊतने (१०९) केलेल्या ३०२ धावांच्या सलामी भागीदारीच्या जोरावर भारताने चौरंगी क्रिकेट मालिकेतील आठव्या सामन्यात आयर्लंडवर २४९ धावांनी विजय नोंदविला. पुरूष व महिला गटात आंतरराष्ट्रीय एकदिवसी क्रिकेटच्या प्रारूपात पहिल गड्यासाठी केलेली ही सर्वात मोठी भागीदारी आहे. दीप्ती व पूनमने श्रीलंकेच्या उपुल थरंगा व सनथ जयसूर्याच्या भागीदारीचा विक्रम मोडीत काढला आहे. २००६ मध्ये उपुल व जयसूर्याने सर्वाधिक २८६ धावांच्या सलामी भागीदारीचा विक्रम नोंदविला होता. मला महिला एकदिवसीय व श्रीलंकेच्या खेळाडूंच्या विक्रमाबाबत काहीच माहिती नव्हती. मी नेहमीच सचिन तेंडुलकरला बघितले व मला सचिन व सौरव गांगुली दरम्यानच्या सुमारे २५० धावांच्या भागीदारीची कल्पना होती. मी व दीप्ती तिनशे धावांच्या भागीदारीच्या जवळपास पोहोचलो होतो तेव्हा आपण इंग्लंडच्या सारा टेलर व कॅरोलिन एटकिन्सच्या २६८ धावांच्या
विक्रमी भागीदारीला मोडीत काढले हे कळले होते, असे पूनम राऊत म्हणाली. (वृत्तसंस्था)