पाकपेक्षा भारताचे पारडे जड ः ख्रिस गेल

0
125

चॅम्पियन्स ट्रॉफी
नवी दिल्ली, १६ मे 
पुढील महिन्यात होणार्‍या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत व पाकिस्तानदरम्यान होणार्‍या सामन्यात भारताचे पारडे जड राहील, असे वेस्ट इंडिजचा तडाखेबंद फलंदाज ख्रिस गेल म्हणाला. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ४ जून रोजी भारत-पाक आमने-सामने उभे ठाकणार आहेत.
भारत व पाकिस्तान हे दोन्ही माझे आवडते संघ असून उभय देशांदरम्यानचा सामना चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्वात मोठा सामना राहील. तसे आयसीसी स्पर्धेत भारत नेहमीच पाकिस्तान संघाला वरचढ ठरत आला आहे.
भारताने गत आठ-नऊ महिन्यात उपमहाद्वीपच्या बाहेर पाऊल ठेवले नाही, तेव्हा अशात इंग्लंडच्या वातावरणात खेळणे भारताला अडचणीचे ठरू शकते काय असा प्रश्‍न विचारला असता गेल म्हणाला की, भारतीय फलंदाजांना इंग्लंडमध्ये कोणतीही त्रास होणार नाही. भारतीय फलंदाज जबरदस्त असून त्यांच्याकडे अनुभव आहे. सर्वांना इंग्लंडमध्ये खेळण्याचा सराव आहे, ही जमेची बाजू आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना तुझी फारशी चमकदार कामगिरी झाली नाही, याबाबत विचारले असता तो म्हणाला की, क्रिकेट हा बेभरवशाचा खेळ आहे. गत मोसमात आम्ही उत्कृष्ट प्रदर्शन केले होते, परंतु यावर्षी आम्ही अपयशी ठरलो. आता बस्स, पुन्हा एकजुट होऊन पुढल्या मोसमात शानदार पुनरागमन करू, आता आम्ही एवढेच करू शकतो, असे तो म्हणाला. सुनील नारायण छान खेळला. त्याचा अशा तर्‍हेचे प्रदर्शन बघून मजा वाटली. त्याने हाणलेेले षटकार मला फारच आवडले, असेही तो म्हणाला.
डोळेबंद करून शतक झळकावू शकतो
माझे वय वाढत आहे, हे खरे आहे. परंतु माझ्या मते वयासोबत तुमचा सामंजस्यपणाही वाढत असते. तुम्ही जितके समजदार व्हाल, तितकाच वेळ खेळपट्टीवर टिकून राहाल. लोग वाढत्या वयाबाबत चर्चा करतील, परंतु माझ्या मते, जर मी जर १०० टक्के तंदुरूस्त राहील, तर मी पूर्वीप्रमाणेच बहारदार नैसर्गिक खेळाचे प्रदर्शन करेल, असेही तो म्हणाला. मी पुन्हा अधिक मजबूत होऊन धमाकेदार पुनरागमन करेल, असे तो म्हणाला.