दहा रुपयाचे नाणे घेण्यास बँकेचा नकार

0
77

नाशिकमध्ये दोन तरुणांचे आंदोलन
नाशिक, १६ मे 
बाजारात दहा रुपयांचे नाणे घेण्याबाबत ग्राहकांमध्ये जो गोंधळ आहे, त्यात आता बँकांचीही भर पडली आहे. ‘ग्राहक आमच्याकडून दहा रुपयांचे नाणे घेत नाहीत, म्हणून आम्हीही ते घेणार नाही’, असे अजब स्पष्टीकरण नाशिकमधील एका बँकेने दिले आहे.
दहा रुपयांचे नाणे घेण्यास नकार दिल्याने दोन शेतकर्‍यांनी नाशिकमधील बँक ऑफ इंडियासमोर आंदोलन सुरू केले आहे. १० हजार रुपयांची ७ हजार नाणी या शेतकर्‍यांनी बँकेसमोर टाकली आहेत.
शिवाजी वाघ आणि नामदेव वाघ असे या शेतकर्‍यांचे नाव आहे. रोज १०० रुपयेच घेऊ, म्हणजे ७ हजार रुपये भरण्यासाठी ७० वेळा बँकेत या, असे बँकेचे म्हणणं आहे. प्रशासनाच्या आदेशानंतरही दहा रुपयांची नाणी घेण्यासाठी बँकांकडून टाळाटाळ केली जात असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.(वृत्तसंस्था)