नवे उपाध्यक्ष सुरेश कांकाणी यांची मिहानला प्रथम भेट

0
131

कामांचा आढावा, अधिकार्‍यांची चर्चा
नागपूर, १६ मे
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे नवनियुक्त उपाध्यक्ष व प्रबंध संचालक सुरेश कांकाणी यांनी आज मिहान प्रकल्पाला भेट दिली व संपूर्ण प्रकल्पाची माहिती घेत अधिकार्‍यांशी चर्चा करून प्रकल्पाच्या कामांचा आढावा घेतला.
या दौर्‍यात कांकाणी यांनी एमएडीसी आणि एमआयएल या दोन्ही संलग्न कंपन्यांच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यात ऊर्जा वितरण व रस्त्यांचे जाळे, इंटरनेट व टेलिकॉम तसेच मिहानमधील इतर सुविधांची पाहणी केली. यासोबतच विमानतळाचा विकास तसेच प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या व पुनर्वसनाची माहिती घेतली. या बैठकीत एमआयएलचे व्ही. एस. मुळेकर, महाप्रबंधन आबिद रुही, लक्ष्मीनारायणन्, सूरज शिंदे, सल्लागार डी. एम. तरटे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
यानंतर एमएडीसीच्या कार्यालयातील कक्षात अधिकार्‍यांची बैठक झाली. त्यात मूलभूत सोयींचा विकास, प्रकल्पग्रस्तांच्या समस्या तसेच पुनर्वसन कार्य पूर्ण करण्याचे निर्देश दिले. या बैठकीत तांत्रिक सल्लागार एस. व्ही. चहांदे, मुख्य प्रबंधक एस. के. चॅटर्जी, अधीक्षक अभियंता रजनी लोणारे, सीएस नवीन बक्षी, मार्केटिंग मॅनेजर समीर गोखले, जनसंपर्क अधिकारी दीपक जोशी, के. आर. इंगोले, बी. आर. तिवारी, बळवंत मोहरील, गजानन एमपल्लीवार उपस्थित होते. या दौर्‍यात कांकाणी यांनी विकसित भूखंडाच्या पाहणीसाठी सुमठाणा तसेच फूड पार्क, हेल्थ सिटी, एअर इंडिया एमआरओ, एचसीएल, टीसीएस आदी ठिकाणी भेटी दिल्या.